गणेशोत्सव असो किंवा पारंपरिक मिरवणूक... ढोलचा आवाज वातावरणात वेगळीच ऊर्जा निर्माण करतो. पण कधी विचार केलाय का, हा ढोल नेमका बनतो तरी कशापासून?
ढोलाचा मुख्य भाग म्हणजे त्याचा पोकळ गोलाकार सांगाडा, जो पारंपरिक पद्धतीने लाकडापासून तयार केला जातो. त्याच्या दोन्ही बाजूंना चामड्याचे पडदे लावले जातात. या पडद्यांवर आघात केल्यामुळे कंपन निर्माण होतात आणि त्यातून ढोलाचा आवाज तयार होतो.
मग ढोलाचा आकार, लाकूड, चामडं आणि त्याचा ताण यांचा आवाजावर कसा परिणाम होतो? ढोलाचा आवाज एवढा मोठा का ऐकू येतो?
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या ढोलाची रचना, त्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि ढोलामागचं ध्वनीविज्ञान अगदी सोप्या भाषेत.
अशाच आपल्या परंपरा, कला आणि रोजच्या आयुष्यातील रंजक माहितीसाठी पाहत राहा Knowledge Katta, फक्त आपलं नाशिकवर.


