आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाचे महत्त्व अधिक वाढले आहे. आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची एक जीवनशैली आहे. योग्य आहार, दिनचर्या, ऋतुचर्या आणि नैसर्गिक उपायांच्या माध्यमातून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल राखण्यास आयुर्वेद मदत करतो.
'आयुर्वेदावर बोलू काही' या विशेष कार्यक्रमात आयुर्वेद तज्ज्ञांकडून दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा कसा उपयोग करता येईल, रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल, तसेच विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
नैसर्गिक उपचारपद्धती आणि पारंपरिक ज्ञानाच्या आधारे निरोगी जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. आरोग्य, आहार आणि जीवनशैलीशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा 'आयुर्वेदावर बोलू काही' फक्त Apla Nashik वर.


