मुंबईत पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. हवामानातील बदल आणि पाण्याच्या सुरक्षिततेचा विचार करता नागरिकांनी पिण्याच्या पाण्याबाबत खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बदलते हवामान आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला कामा हॉस्पिटलचे डीन डॉ. तुषार पालवे यांनी दिला आहे. घराबाहेर पडताना उकळून थंड केलेले पाणी सोबत ठेवावे, पुरेसे पाणी प्यावे आणि प्रदूषण जास्त असलेल्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

तब्येतीत काही त्रास जाणवल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. महापालिकेच्या आवाहनानुसार नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेण्यावर भर द्यावा.