राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
या शिबिरासाठी राज्यभरातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि निमंत्रित कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. शिबिराचा अजेंडा आणि विचारमंथनाची रूपरेषा लवकरच निश्चित केली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे.


