राजकारणात वेगवेगळ्या पक्षांची भूमिका असली तरी नात्यांमध्ये जिव्हाळा कायम असल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा आणि रोहिणी खडसेंचा असाच खास अंदाज पाहायला मिळाला.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.

राजकीय व्यस्तता बाजूला ठेवत दोघींनी पारंपरिक फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. ननंद-भावजयीच्या या जिव्हाळ्याच्या क्षणाने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांचं लक्ष वेधून घेतलं.

राजकारणात वेगवेगळ्या पक्षांत असल्या तरी कुटुंबातील नात्याचा हा खास अंदाज समोर आला. रक्षा आणि रोहिणी खडसेंच्या फुगडीचा हा क्षण आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.