नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत सुरू असलेल्या चर्चांना खासदार राजाभाऊ वाजे यांनी पूर्णविराम दिला आहे. नाशिक-शिर्डी मार्गे नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम मार्ग निश्चित झाल्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

त्यामुळे तज्ज्ञ समितीचा अहवाल येण्यापूर्वी कोणताही मार्ग अंतिम मानता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार राजाभाऊ वाजे यांनी मांडली आहे.

नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचा मार्ग अंतिम झाल्याच्या चर्चांमुळे निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला असून, समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय स्पष्ट होणार आहे.

नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबतची नेमकी वस्तुस्थिती आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी काय स्पष्ट केलं, जाणून घ्या या बातमीत.

आपलं नाशिक | आपला आवाज