नाशिकच्या विभागीय कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच कार्यालयाबाहेर एका महिलेने गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मंत्री गिरीश महाजन कार्यालयात उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

महिलेने उपनगर पोलिसांवर गंभीर आरोप करत आपल्या मुलाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी महिलेने पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप करत जोरदार संताप व्यक्त केला.

तसेच आपल्या मुलाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तिने केली.

मुलाला मारहाण करणाऱ्यांना सोडणार नसल्याचेही महिलेने सांगितले.

परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्यात नेले.

या प्रकारामुळे विभागीय कार्यालयाबाहेर काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महिलेने केलेल्या आरोपांबाबत पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.