नाशिक महापालिका मुख्यालयातील सुरक्षाव्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
महापौर आणि उपमहापौरांच्या दालनाबाहेर अग्निशमन यंत्र लावण्यात आले आहे.
मात्र या यंत्राची मुदत मे २०२४ मध्येच संपल्याची माहिती समोर आली आहे.
मुदत संपून दोन वर्षांनंतरही हे अग्निशमन यंत्र बदलण्यात आलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
आगीसारखी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या यंत्राचा कितपत उपयोग होईल, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिका मुख्यालयातील सुरक्षाव्यवस्थेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
मुदतबाह्य अग्निशमन यंत्र तातडीने बदलण्याची मागणी होत आहे.