नाशिकच्या रामकुंड परिसरातील गंगा-गोदावरी मंदिरासमोर पाण्यात अडकलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची रेस्क्यू टीमने यशस्वी सुटका केली. सकाळी सुमारे ८ वाजता घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

रेस्क्यू मोहिमेदरम्यान स्थानिक तरुणांनीही मदतकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

या यशस्वी बचावकार्यानंतर उपस्थित नागरिकांनी रेस्क्यू पथक आणि मदत करणाऱ्या स्थानिक तरुणांचे कौतुक केले. या घटनेमुळे रामकुंड परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.