नाशिक : सातपूर परिसरात एका वृद्धावर दगडाने हल्ला करून मोबाईल लुटणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

१७ जुलै रोजी आयटीआय मागील वस्तीगृह परिसरात फिर्यादीवर धनराज सुनील वाघ याने कोणतेही कारण नसताना दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील सुमारे २० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

 

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी हल्ला करून पळून जाताना स्पष्ट दिसून आला.


https://youtu.be/J73QuOsruh0?si=UQG6SrMoCSDY9ldb 

 

त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी गाव परिसरात सापळा रचून धनराज सुनील वाघ याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.