गणेशोत्सव जवळ येताच बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. गणेशमूर्तींची निवड, घरातील सजावट आणि बाप्पाचा आकर्षक पेहराव यासाठी भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र यंदा गणेशमूर्तींच्या सजावटीत एक नवा ट्रेंड विशेष चर्चेत आहे.

फेटा, शेला, स्टोनची लेस, ब्रॉच आणि आकर्षक दागिन्यांनी सजवलेल्या रेडी गेटअप गणेशमूर्तींना भाविकांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक पेहरावाला आधुनिक आणि आकर्षक सजावटीची जोड देत बाप्पाच्या मूर्तींना वेगळे रूप दिले जात आहे.

पूर्वी साध्या स्वरूपातील गणेशमूर्ती घरी आणल्यानंतर भाविक आपल्या आवडीनुसार त्यांची सजावट करत असत. मात्र आता बाजारात आधीपासून सजवलेल्या रेडी गेटअप गणेशमूर्ती उपलब्ध होत असून, त्यामुळे वेगळी सजावट करण्याची गरज कमी होत आहे. याच कारणामुळे अशा मूर्तींची मागणी वाढताना दिसत आहे.

गणेशमूर्तीच्या आकारानुसार आणि त्यावरील सजावटीच्या प्रकारानुसार किंमत ठरते. फेटा, शेला, स्टोन लेस, ब्रॉच आणि विविध दागिन्यांचा वापर करून प्रत्येक मूर्ती आकर्षक बनवली जाते. या सजावटीमागे कारागिरांची मेहनत आणि बारकाईने केलेले कामही महत्त्वाचे असते.

गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी सजवलेल्या गणेशमूर्तींची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भक्तीबरोबरच बाप्पाच्या सजावटीत बदलते ट्रेंडही पाहायला मिळत असून, फेटा-शेल्यातील आणि रेडी गेटअपमधील बाप्पा यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांच्या पसंतीस कितपत उतरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज