एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘आपली एसटी’ अॅपमुळे बस कुठे आहे हे मोबाईलवर कळणार 🚌📱

एसटीने प्रवास करताना बस नेमकी कुठे आहे आणि ती आपल्या थांब्यावर किती वाजता पोहोचणार, हा प्रश्न प्रवाशांना कायम पडतो. आता या समस्येवर डिजिटल माध्यमातून तोडगा काढण्याच्या दिशेने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

प्रवाशांसाठी ‘आपली एसटी’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आलं असून, या अॅपच्या माध्यमातून बसचं ठिकाण, वेळापत्रक आणि प्रवासाशी संबंधित विविध माहिती मोबाईलवर मिळू शकणार आहे.

अॅपमधील ‘Track Your Bus’ सुविधा कशी काम करणार? बस सध्या नेमकी कुठे आहे हे प्रवाशांना कसं पाहता येणार? बसच्या वेळापत्रकाची माहिती कशी मिळणार? तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ही डिजिटल सुविधा किती उपयुक्त ठरू शकते?

एसटी प्रवाशांच्या प्रवासात बदल घडवून आणणाऱ्या या नव्या डिजिटल सुविधेची संपूर्ण माहिती जाणून घ्या ‘आपलं नाशिक’च्या खास Explainerमध्ये.

🚌 आपलं नाशिक | आपला आवाज