सुरगण्यात बोरगाव–सुरगाणा मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी महिनाभरापूर्वी करण्यात आलेली तात्पुरती दुरुस्ती पावसामुळे पुन्हा फोल ठरली आहे. खड्ड्यांमध्ये टाकलेली माती वाहून गेल्याने रस्ता पुन्हा खड्डेमय झाला असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.