पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. कामादरम्यान अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने दोन मजूर मातीखाली अडकले. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या मजुराला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

या घटनेची माहिती मिळताच बचावकार्य करण्यात आले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यापैकी एका मजुराला वाचवण्यात यश आले; मात्र दुसऱ्या मजुराचा मृत्यू झाला.

दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची पाहणी केली. या संपूर्ण प्रकरणाची शासनस्तरावरून चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पुणे-सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.