नाशिकच्या भद्रकाली परिसरातील जिजामाता दवाखान्याजवळ कचऱ्याचे ढीग साचले असून सरस्वती लेनमधील कचराकुंडी ओसंडून वाहत आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे. सफाई ठेका असूनही कचरा साचत असल्याने प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.