नाशिकमध्ये भाजपच्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा संघटनात्मक बैठकीला सुरुवात झाली आहे. आडगाव नाका येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे.

या बैठकीला मंत्री अतुल सावे, संजय सावकारे आणि पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत.

बैठकीत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला जात आहे. विविध मतदारसंघांतील संघटनात्मक कामकाज, पदाधिकाऱ्यांची भूमिका आणि आगामी कार्यक्रमांबाबत चर्चा होणार आहे.

यासोबतच SIR संदर्भातील सुरू असलेल्या कामाची माहिती, मतदार यादी आणि संबंधित प्रक्रियेबाबत पक्षाची तयारी यावरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, पक्षविस्तार आणि पक्षाची पुढील रणनीती याबाबत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

भाजपच्या आगामी राजकीय आणि संघटनात्मक नियोजनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होत असलेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.