नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरजवळील चक्रतीर्थ चाकोरे येथे धर्मध्वज स्थापन करण्याची मागणी पुढे आली आहे. महंत सोमेश्वरानंद महाराज यांनी चक्रतीर्थ चाकोरे हे कुंभस्थान असल्याचा दावा करत, येत्या ३१ ऑक्टोबरला येथे धर्मध्वज उभारण्याची मागणी केली आहे.
चक्रतीर्थ परिसरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभाराव्यात, तसेच धर्मध्वज स्थापनेसाठी आखाडा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशी भूमिका महंतांनी मांडली आहे. या मागणीवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.


