नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. वागदर्डी शिवारात धरणाजवळ स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. या कारवाईत गांजासह सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी या कारवाईदरम्यान दोन दुचाकीही जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये मनमाड आणि चांदवड येथील रहिवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी संबंधित संशयितांविरोधात अमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.