नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने दोघांना शिर्डीतून अटक केली आहे. मित्रासोबत पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तरुणाला स्मशानभूमीजवळ नेऊन चामडी पट्टा आणि फायटरने मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीचे व्हिडिओ शूटिंग केल्याचाही आरोप असून, घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार होते. शिर्डीच्या भाजी बाजारात सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपींना देवळाली कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.


