डोंगराळे बालिका हत्याप्रकरणात आरोपी शेखरविरुद्ध न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यात आले आहेत. पूर्वनियोजित अमानुष अत्याचार आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सिद्ध झाल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. आरोपीचे मानसिक संतुलन सक्षम असल्याचेही न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट झाले. या प्रकरणाचा निकाल ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी जाहीर होणार आहे.