आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांतील प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हरसूलमध्ये ‘भीक माँगो’ आंदोलन करण्यात आले. जीवन भोये आणि विवेक गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
आंदोलनादरम्यान नागरिकांकडून चिल्लर स्वरूपात मदत गोळा करण्यात आली. आश्रमशाळांमधील प्रलंबित प्रश्न सोडवावेत आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आश्रमशाळांच्या प्रश्नांवर प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. हजारो आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी हा लढा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनाला आमदार हिरामण खोसकर यांची उपस्थिती होती. स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.
आश्रमशाळांच्या ढिसाळ कारभारावर रोष व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.


