इगतपुरीत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची गंभीर घटना समोर आली आहे. एकाच परिसरात सात जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला असून, जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. एका चिमुकल्याच्या हाताचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची माहिती आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांनी ॲनिमल वेल्फेअर संस्थेला पाचारण केले असून, मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.


