नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी माहिती दिली आहे.

कुंभमेळ्यासाठी तब्बल २५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला.

या विकासकामांमुळे आगामी काळात नाशिकचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील खड्ड्यांचा मुद्दा चर्चेत असताना पुढील चार-पाच दिवसांत नाशिक खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिव राम यात्रेतून नाशिकचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा दाखवण्याची भूमिका त्यांनी मांडली.

बनावट कार्यादेश प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत अभ्यास सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले.

तसेच कुंभमेळ्याला ‘सिंहस्थ महाकुंभ’ नाव देण्याची भूमिका, त्र्यंबकेश्वर रस्ता कामाला वेग आणि महायुती एकसंध असल्याचा दावाही त्यांनी केला.