नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला धार्मिक विधींनी सुरुवात झाली आहे. कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या पूजन सोहळ्याला साधू-महंतांची उपस्थिती होती.

येत्या एकतीस ऑक्टोबरला सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार असून, या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असल्याचे नियोजन आहे. त्र्यंबकेश्वर नगरीत सिंहस्थाचा उत्साह वाढत असून, प्रशासनाकडून सोहळ्याच्या तयारीला वेग देण्यात आला आहे.