नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोट्यवधी रुपयांच्या मोबाईल चोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दिल्ली ते पुणे वाहतूक होणाऱ्या मोबाईल मालाची अफरातफर झाल्याचे प्रकरण समोर आले असून, या प्रकरणात ट्रकचालक आणि स्थानिक आरोपींचे संगनमत असल्याचा संशय आहे.

मालेगाव तालुका पोलिसांनी कारवाई करत एकूण चारशे तीस मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. ट्रकसह सुमारे पंधरा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोल्ट्री फार्ममधून मोबाईलचे बॉक्स जप्त करण्यात आले असून, हॉटेलजवळ माल उतरवला जात असताना पोलिसांनी धाड टाकली. ट्रान्सपोर्ट प्रतिनिधीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.