महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफचा भरणा गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाकडून सवलतमूल्याची रक्कम थकीत असल्यामुळे सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना याचा फटका बसत असल्याची माहिती आहे.
पीएफचा भरणा रखडल्याने कर्मचाऱ्यांची पेन्शन, कर्ज आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक लाभ अडचणीत आले आहेत. फॅमिली पेन्शन मिळण्यातही अडथळे निर्माण होत आहेत. नाशिकमधील सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत असून, प्रलंबित लाभ तातडीने देण्याची मागणी होत आहे.


