मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २३ वर्षीय रवी वीरचंद्र पाल यांचा मृत्यू झाला.
या अपघातात आणखी एक जण जखमी झाला असून, धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी तपास सुरू केला असून, अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.


