नाशिकच्या नांदूर नाका परिसरात ओली लाकडे घेऊन जाणारी आयशर गाडी पलटी झाली.
मजा हॉटेलसमोर दुपारच्या सुमारास हा अपघात घडला.
चाकाचे बोल्ट तुटल्याने चालकाचा ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती आहे.
आयशर पलटी झाल्यानंतर त्यातील ओली लाकडे रस्त्यावर पसरली.
अपघातात आयशरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुदैवाने या अपघातात चालक सुरक्षित असून जीवितहानी टळली.
अपघातामुळे काही काळ नांदूर नाका परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला.
घटनेनंतर रस्त्यावर पसरलेली लाकडे हटवण्याचे काम करण्यात आले.


