नाशिकच्या खोडेनगर परिसरात जलवाहिनी फुटल्याने गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार समोर आली आहे. प्रभाग क्रमांक तेवीसमधील नागरिकांनी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप केला असून, लाखो लिटर पाणी वाया गेल्याचेही सांगितले जात आहे.
पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, टँकर उपलब्ध न केल्याने महिला वर्गातूनही संताप व्यक्त केला जात आहे. पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


