नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांत नाशिककरांना रात्री बारापर्यंत दांडिया खेळता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने अठरा ते वीस ऑक्टोबरदरम्यान लाउडस्पीकरलाही रात्री बारापर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, ध्वनी मर्यादा पाळणे बंधनकारक असून, पंचाहत्तर डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास कारवाई आणि नियमभंग केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.