नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा उत्साह पाहायला मिळत असून तपोवनातून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले आहेत.
नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त तसेच महिला आणि पुरुष भाविक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. भगव्या पताका आणि जयघोषामुळे तपोवन परिसर भगवामय झाला आहे.
तपोवनातून सुरू झालेली ही शोभायात्रा रामकुंडाच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. शोभायात्रेमुळे नाशिकमध्ये धार्मिक उत्साहाला उधाण आले असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.


