नाशिकमधील दुतोंड्या मारुतीला कुंभमेळ्यानिमित्त चांदीचे डोळे आणि टिळा अर्पण करण्यात आला आहे. सराफ व्यावसायिक नागरे यांनी भक्तिभावाने ही सेवा मारुतीच्या चरणी अर्पण केली.

यामध्ये १०१ ग्रॅम वजनाचे चांदीचे डोळे आणि ४१ ग्रॅम वजनाचा चांदीचा टिळा यांचा समावेश आहे. या वस्तूंची निर्मिती सुवर्ण कारागिराकडून करून घेण्यात आली.

चांदीचे नेत्र आणि टिळा अर्पण केल्यानंतर दुतोंड्या मारुतीचे रूप अधिक मनमोहक दिसत आहे. या सेवेमुळे भाविकांकडून नागरे यांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी असून नाशिकमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.