नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर भरधाव कारचा भीषण अपघात झाला. कार थेट कंपाउंडवर आदळून उलटल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.