नाशिक शहरातील पाणीकपातीबाबतचा अंतिम निर्णय १५ ऑक्टोबरनंतर होणार आहे. महापालिकेने गंगापूर समूहातून आठ टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवली आहे.
पाणी आरक्षणाच्या बैठकीत काय निर्णय होणार? मागणीनुसार पाणी कोटा न मिळाल्यास नाशिकमध्ये पाणीकपात लागू होणार का? सिंहस्थ कुंभपर्वासाठी विशेष पाण्याची मागणी करण्यात आली असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्णयाकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.


