मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर दाखल झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई नाका परिसरात राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले.

 

राज ठाकरे यांचा हा दोन दिवसीय नाशिक दौरा असून, या दौऱ्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

दौऱ्यादरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला जाणार असून, मनसेच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहरात ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आहे.