अभिनेते राजपाल यादव यांनी सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडली. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राजपाल यादव सध्या कोणत्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहेत का, असा सवाल केला. या प्रश्नाला उत्तर देताना यादव यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दीबाबत माहिती दिली.

राजपाल यादव यांनी आपण आतापर्यंत सुमारे २५० चित्रपटांमध्ये काम केल्याचं सुप्रीम कोर्टात सांगितलं. आपल्या दीर्घ फिल्मी प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी गेल्या १३ वर्षांत जवळपास २५० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावाही केला.

यादव यांनी ‘अता पता लापता’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. या चित्रपटात आपण सुमारे १७ कोटी रुपये गुंतवले होते आणि त्यातून नुकसान झाल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

सुनावणीदरम्यान झालेल्या या संवादामुळे राजपाल यादव यांच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच त्यांच्या आर्थिक अडचणींचीही चर्चा झाली. मात्र, २५० कोटी रुपयांच्या नुकसानासह अन्य आर्थिक आकडे हे राजपाल यादव यांनी न्यायालयात मांडलेले दावे आहेत.