पिंपळगाव बाजार समितीच्या सत्ताधारी गटात फूट पडल्याच्या चर्चांना आमदार दिलीप बनकर यांनी पूर्णविराम दिला आहे. बाजार समितीचे सात संचालक नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं बनकर यांनी स्पष्ट केलं आहे.
बाजार समितीतील सर्व संचालक आपल्यासोबतच असल्याचा दावा आमदार दिलीप बनकर यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातील काही संचालक संपर्काबाहेर असल्याच्या चर्चांवर त्यांच्या स्पष्टीकरणामुळे पडदा पडला आहे.
दरम्यान, पिंपळगाव बाजार समितीतील राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी गटात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत बनकर यांनी सत्ताधारी गट एकसंध असल्याचं स्पष्ट केलंय.
आता आमदार दिलीप बनकरांच्या या दाव्यानंतर बाजार समितीतील पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागलं आहे.
आपलं नाशिक | आपला आवाज


