सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. मेळा स्थानकातून आता २४ तास बससेवा उपलब्ध होणार असून, दररोज शंभर बसेस धावणार आहेत. भाविकांना थेट गडापर्यंत जाता येणार असल्याने नांदुरी येथे बस बदलण्याची गरज राहणार नाही. गर्दीनुसार जादा बसेसही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.