नाशिक-मुंबई महामार्गावरील सिन्नर फाटा उड्डाणपुलावर विटांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रक दुभाजकावर जाऊन उलटल्याने त्यामधील विटा नाशिक-मुंबई लेनवर विखुरल्या आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावर विखुरलेल्या विटांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.
पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी रस्त्यावरील अडथळा दूर करण्याचे काम हाती घेतले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाने वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


