नाशिकमध्ये गेल्या १७ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच असून, विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या आगमनानंतर गोल्फ क्लब परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी राजकीय वातावरणही पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार असून, त्यांच्या मागण्या आणि समस्यांबाबत ते काय भूमिका मांडतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या भेटीनंतर आंदोलनाला कोणती दिशा मिळते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पुढील भूमिका काय राहते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.