नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिनशेत परिसरात आज पहाटे ५ वाजून ३२ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला.
या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
या भूकंपाचे कंपन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा परिसरातही जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
भूकंपामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मात्र सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाही.
भूगर्भीय हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने सुरगाणा परिसरात अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ यंत्रणा कार्यान्वित केली आहे.


