समृद्धी महामार्गावर ITMS अंतर्गत CCTV कॅमेऱ्यांसाठी Gantry बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या कामामुळे सिन्नर ते इगतपुरीदरम्यान विविध टप्प्यांवर ठराविक वेळेत वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान महामार्गावरील काही भागात निर्धारित वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. Gantry उभारणीच्या कामासाठी हे वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले असून, वाहनचालक आणि प्रवाशांनी याची नोंद घेणं आवश्यक आहे.
या कालावधीत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवासाचं वेळापत्रक आधीच नियोजित करून महामार्गाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. वाहतूक निर्बंधांच्या वेळेत प्रवास टाळल्यास संभाव्य गैरसोय आणि विलंब टाळता येऊ शकतो.
समृद्धी महामार्गावरील वाहतूक निर्बंध, Gantry बसवण्याचं काम आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
आपलं नाशिक | आपला आवाज


