त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या धर्मध्वजावरील बोधचिन्हावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ध्वजस्तंभावर खासगी संघटनेचा लोगो वापरल्याचा आरोप माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी केला असून, पुरोहित संघाच्या बोधचिन्हावरही आक्षेप घेण्यात आला आहे. ध्वजस्तंभ पूजनानंतर सुरू झालेल्या या वादाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.