पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३६ व्या 'मन की बात' कार्यक्रमाचे येवला येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी नाशिक जिल्ह्यातील धरणे आणि विणकर बांधवांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी पर्यावरण संवर्धनासाठी 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमातून नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत येवला भाजपने आगामी काळात वृक्षारोपण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
सामूहिक श्रवण कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.


