येवला बाजार समितीत व्यापारी लिलावात सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्प झाला आहे. व्यापाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर आंदोलन करत ‘रास्ता रोको’ केला. कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.