सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील सुरू असलेल्या कामांवर विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज साधू-महंतांनी रामकुंड परिसराची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. या पाहणीनंतर घाटांवरील पायऱ्यांच्या कामासह परिसरात सुरू असलेल्या कामांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंड परिसरात ध्वजारोहण होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्यापूर्वी परिसरातील कामांची पाहणी करण्यात आली. मात्र, सुरू असलेल्या कामांबाबत साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केल्याने कुंभमेळ्याच्या तयारीकडे लक्ष वेधले गेले आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील कामांचा मुद्दा चर्चेत आला आहे.


