नाशिक शहरातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही आगामी वर्षासाठीच्या पाणी आरक्षणातील तुटीमुळे नाशिककरांवर पाणीकपातीचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेने आगामी वर्षासाठी ७ हजार ३७० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली आहे. मात्र, जलसंपदा विभागाने बाष्पीभवनासह ६ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकी प्रत्यक्ष वापरासाठी ५ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवण्यासाठी २५ टक्क्यांपर्यंत पाणीकपात करावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे, राज्य शासनाच्या धोरणानुसार दिवाळीनंतर १० टक्के पाणीकपात लागू करण्याची तयारी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दर्शवली आहे. त्यामुळे पाणी आरक्षणाबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अंतिम निर्णयाकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र
ब्रेकिंग
धरणं भरलेली, तरी नाशिककरांवर २५ टक्के पाणीकपातीचं संकट!
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
महाराष्ट्र
धरणं भरलेली, तरी नाशिककरांवर २५ टक्के पाणीकपातीचं संकट!
महाराष्ट्र
मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या; महापालिकेचे आवाहन, डॉक्टरांनी दिला आरोग्याचा सल्ला
महाराष्ट्र
मुंबई–बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन ३ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता
महाराष्ट्र
बीडमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; आलिशान क्लिनिकमधून रुग्णांवर उपचार
महाराष्ट्र
ठाण्यात संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी घेतली पूर्णेकर कुटुंबीयांची भेट


