डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाला आता महत्त्वाचं वळण मिळालं आहे. या प्रकरणात आरोग्य विभागाने मोठी प्रशासकीय कारवाई सुरू केली असून, संशयित मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्यावर निलंबनाची प्रक्रिया शासकीय पातळीवर वेगाने पुढे सरकत आहे.

सत्र न्यायालयाने दोन्ही संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आरोग्य विभागाकडूनही संबंधित दोघांविरोधात प्रशासकीय पातळीवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आता न्यायालयीन कारवाईसोबतच शासकीय पातळीवरही वाढली आहे.

डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणाने यापूर्वीच मोठी चर्चा निर्माण केली होती. आता संशयित डॉक्टरांवर निलंबनाची प्रक्रिया सुरू झाल्याने पुढील काळात आरोग्य विभागाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागलं आहे.

या प्रकरणातील न्यायालयीन कारवाई, आरोग्य विभागाचा निर्णय आणि पुढील घडामोडी काय असतील, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. प्रकरणाशी संबंधित अधिकृत माहिती आणि पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.