नाशिक रोड  : नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील खोले मळा परिसरात कौटुंबिक वादाचे हिंसक रूप समोर आले आहे. संतापाच्या भरात पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक कारणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.

 

https://www.aplanashik24.tv/maharashtra/tuljabhavani-devasthan-land-scam-allegations-inquiry-demand-by-maharashtra-temple-federation

 

घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांकडून संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.

दरम्यान, कौटुंबिक वादातून ही घटना  घडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.