कुंभमेळ्यातील कामांच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात आणखी पाच ते सात आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
अटकेतील आरोपी आपला दूरचा नातेवाईक असला, तरी प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता असून, मोठ्या आर्थिक व्यवहारांबाबतही माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


